22 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला अंतर्गत सव्हेतून हादरा, देशात भाजपाला केवळ 130 जागा मिळणार, भाजप-RSS प्रचंड तणावात

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील स्पर्धा अत्यंत रंजक होताना दिसत असली तरी भाजप आणि गुजरात लॉबीमध्ये प्रचंड धडकी भरल्याचं वृत्त आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएस’ने आगामी लोकसभा निवडणूक आणि आगामी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी एक सविस्तर सर्व्ह करून घेतला होता. त्याचे निकाल भाजप वरिष्ठांच्या हातात आल्यापासून अनेकजण धास्तावल्याचं वृत्त आहे. अगदी मोदी-शहा देखील धावपळीत असल्याचं वृत्त आहे.

मोदी-शहांच्या धाकधुकीचं कारण म्हणजे या लेटेस्ट अंतर्गत सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी. होय! कारण या आकडेवारीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात भाजपाला केवळ १३० जागा मिळतील आणि आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 4 प्रमुख राज्यांमध्ये दणदणीत विजय होईल अशी आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे तेलंगणात देखील काँग्रेस सत्तेत येईल असे संकेत याच भाजपच्या सर्व्हेत देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची अवस्था अत्यंत दयनीय होईल असं म्हटलं आहे. भाजपच्या वरिष्ठांनी आणि RSS प्रमुखांनी हा सव्हे आणि त्यातील आकडेवारी मान्य केली असून त्याच अनुषंगाने धावपळ सुरु केली आहे.

भाजपच्या याच सर्वेक्षणाच्या आकडेवारीनंतर बिथरलेल्या भाजपच्या गुजरात लॉबीने कोणालाही विचारात न घेता तिकीट वाटपात एकतर्फी निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे. याच सर्व्हेतील आकडेवारीला घाबरून भाजपच्या गुजरात लॉबीने मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधासभेची तिकीट जाहीर केली आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारमधील अनेक विद्यमान मंत्र्यांना आणि आमदारांना लोकसभेत उतरवलं जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस देखील सुटणार नाहीत अशी माहिती दिल्लीतील भाजपसाबंधित पत्रकारांनी दिली आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक विद्यमान खासदारचं डिपॉझिट जप्त होईल आणि त्यात अनेक केंद्रीय मंत्री देखील असतील असं या सर्व्हेत समोर आलं आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा अत्यंत भीषण पराभव होईल असं या सर्व्हेतील आकडेवारी सांगते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि बिहारमध्ये तर भाजप जेमतेम एक आकडी जागा जिंकेल अशी माहिती आहे. तसेच उत्तर प्रदेशातही भाजपाला 20 चा वर लोकसभेच्या जागा मिळणार नाहीत अशी माहिती आहे. मोदींच्या सध्या राजस्थान, मध्य प्रदेशातील आणि छत्तीसगड सभा होतं असल्या तरी त्यात मोदींच्या देहबोलीत देखील याच सर्व्हेची आकडेवारी स्पष्ट दिसत असल्याचं वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत.

News Title : Lok Sabha Election 2024 BJP Internal Survey Report 29 September 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x