25 November 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News
x

Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?

Reliance Share Price

Reliance Share Price | संपूर्ण आशियातील खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला Jio Financial Services कंपनीचे विलगिकरण करणे किंचित महागात पडले आहे, असे वाटते. कारण Jio Financial Services कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. याकाळात सेन्सेक्समध्ये देखील 3 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे.

याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सच्या तुलनेत फार निराशाजनक कामगिरी केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2,348.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 2,342.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17,72,585 कोटी रुपये आहे. 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,83,122 कोटी रुपये होते. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपला वित्तीय सेवा व्यवसाय वेगळा केला आहे.

या डिमर्जरनंतर JFS कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. काही ब्रोकरेज फर्म्सने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2,600-3,000 रुपये किंमत स्पर्श करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,821 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर Jefferies ने या कंपनीच्या शेअरवर 2,950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. BOB कॅपिटल मार्केट्स फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3,015 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर 2,898 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,650 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि कोटक इन्स्टिट्यूशन फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2,600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक सध्या मजबूत रिफायनिंग बिल्ड-आउटचा फायदा घेण्यासाठी आणि आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 12 डॉलर्स किमतीवर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहे. 20 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या अहवालात मॉर्गन स्टॅन्ले फर्मने म्हंटले आहे की, रिलायन्स कंपनीचे कमाईचे चक्र लहान होत आहे.

नवीन क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मच्या मते रिफायनिंग मार्जिनमुळे RIL कंपनीपुढे सप्लाय-साइड मोठी आव्हाने आहेत. एकीकडे ब्रॉडबँड ग्राहक वर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, आणि गॅस उत्पादनात देखील मजबूत वाढ होत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price on 30 September 2023.

हॅशटॅग्स

Reliance Share price(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x