22 November 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

LPG Price Hike | हिंदू-मुस्लिम आणि धार्मिक वृत्तांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांचं अभिनंदन! LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आधी दिलासा नंतर वाढ

LPG Price Hike

LPG Price Hike | लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केवळ निवडणुकीची मार्केटिंग करण्यासाठी मोदी सरकारने केलेला खटाटोप आणि त्याची खरी बाजू काही दिवसात सिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या मतदारांची केवळ थट्टा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

कारण सणासुदीच्या काळात आजपासून एलपीजी सिलिंडर महागले आहेत. दिल्लीत २०९ रुपयांनी तर कोलकात्यात किंमतीत 203.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर मुंबईतील ग्राहकांना 202 रुपयांचा धक्का बसला आहे. चेन्नईतही गॅस सिलिंडरच्या दरात 203 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी छोटे-मोठे उद्योग, खानावळी तसेच हॉटेल्स चालवणाऱ्यांना धक्का बसल्याने त्याची किंमत सामान्य लोकांना देखील बसणार आहे जे या सेवांचा उपयोग करतात. सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र लवकरच तो देखील होईल अशी बातमी आहे.

गेल्या महिन्यात १५७ रुपयांची कमी केली होती
गेल्या महिन्यात एलपीजीच्या घरगुती ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारने व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 1 सप्टेंबररोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 157 रुपयांनी कमी होऊन 1522.50 रुपये झाली आहे. पण आज ते पुन्हा एकदा महाग झाले आहे.

1 ऑक्टोबरला 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर
दिल्लीत आजपासून 1522.50 रुपयांऐवजी 1731.50 रुपये आणि कोलकात्यात 1636 रुपयांऐवजी 1839.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आधी मुंबईत याची किंमत १४८२ रुपये होती आणि आता ती १६८४ रुपये झाली आहे. तर चेन्नईत याची किंमत 1898 रुपये झाली आहे.

30 ऑगस्ट रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयानंतर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे अशी बोंबाबोंब मोदी सरकारने केली, पण वास्तविक अधिकच्या काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा सध्याचे आजही खूप महाग आहेत. दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ९०३ रुपयांना विकला जात आहे. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा २०० रुपये स्वस्त दरात सिलिंडर मिळत आहेत.

आज या किमतीत मिळणार घरगुती सिलिंडर
इंडियन ऑइलनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 901 रुपये, कोलकातामध्ये 945 रुपये, मुंबईत 926.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 902.50 रुपये होती. आता ऑक्टोबर 2023 च्या 9 वर्षांनंतरही दिल्लीत 903 रुपये, कोलकातामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

News Title : LPG Price Hike from 01 October 2023.

हॅशटॅग्स

#LPG Price Hike(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x