Omaxe Share Price | अबब! ओमेक्स शेअरने 7 दिवसात 73 टक्के परतावा दिला, भरघोस कमाई करायची असेल तर डिटेल्स जाणून घ्या
Omaxe Share Price | मागील काही दिवसांपासून ओमेक्स लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 43.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड या रियल्टी कंपनीचे शेअर्स 75.33 रुपये किमतीवर पोहोचले होते.
29 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 106 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 42.39 रुपये होती. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 75.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीने यापूर्वी आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स देखील वाटप करून मजबूत फायदा पोहोचवला होता. या रिअल इस्टेट कंपनीने नोव्हेंबर 2013 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 10:39 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 39 शेअर्सवर 10 बोनस शेअर्स मोफत जारी केले होते. कंपनीचा लाभांश देण्याच्या बाबतीत चांगला रेकॉर्ड आहे आणि ती गुंतवणूकदारांना सतत लाभांश देत आहे.
ओमेक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1377 कोटी रुपये आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 213.45 कोटी रुपयेची विक्री नोंदवली होती. या कंपनीच्या विक्रीत मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 76.23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जून 2022 च्या तिमाहीत ओमेक्स लिमिटेड कंपनीने 121.2 कोटी रुपये मूल्याची निव्वळ विक्री नोंदवली होती.
जून 2023 च्या तिमाहीत ओमेक्स लिमिटेड कंपनीला 106.35 कोटी रुपयेचा तोटा सहन करावा लागला होता. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ओमेक्स लिमिटेड कंपनीला 48.97 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. ओमेक्स लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 74.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Omaxe Share Price today on 02 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC