18 November 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stocks | करोडमध्ये परतावा देणारा थेमिस मेडिकेअर शेअर स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | थेमिस मेडिकेअर या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आणि कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणुकदारांना 5 रुपये लाभांश देखील वितरित केला आहे. आता पुन्हा एकदा या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत.

आता थेमिस मेडिकेअर ही कंपनी आपले शेअर्स 10 भागात विभाजित करणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी थेमिस मेडिकेअर कंपनीचे शेअर्स 3.74 टक्के वाढीसह 1,828.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

थेमिस मेडिकेअर या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, थेमिस मेडिकेअर ही कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. कंपनीने स्टॉक विभाजनासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. सप्टेंबर 2023 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 5 रुपये लाभांश वाटप केला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 1 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता.

22 फेब्रुवारी 2002 रोजी थेमिस मेडिकेअर कंपनीचे शेअर्स 18.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1809.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच मागील 21 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घकालीन नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

11 नोव्हेंबर 2022 रोजी थेमिस मेडिकेअर कंपनीचे शेअर्स 875.10 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर अवघ्या 10 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 109 टक्क्यांनी वाढून 1825 रुपये किमतीवर पोहोचले होते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत थेमिस मेडिकेअर स्टॉकची किंमत 56 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Themis Medicare share price 02 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x