23 November 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Saakshi Medtech Share Price | लॉटरी लागली! साक्षी मेडटेक अँड पॅनल्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 50 टक्के परतावा दिला

Saakshi Medtech Share Price

Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 50 टक्के प्रीमियम वाढीसह 146 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सूचीबद्ध झाल्यावर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 153.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या कंपनीच्या शेअरने 56.50 रुपयेची वाढ नोंदवली होती. या कंपनीचा IPO 91 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 153.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचा IPO एकूण 91.65 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 75.88 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील राखीव कोटा 200.78 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोट्याला 37.35 पट अधिक सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होते. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 92-97 रुपये निश्चित केली होती. कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स ठेवले होते.

किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी एका लॉटसाठी एक करु शकत होते. म्हणजेच एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 116,400 रुपये जमा करावे लागले होते. साक्षी मेडटेक कंपनीच्या IPO चा आकार 45.16 कोटी रुपये होता.

या कंपनीचा IPO 25 सप्टेंबर 2023 ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते, जे आता कमी होऊन 73.63 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Saakshi Medtech Share Price 04 October 2023.

हॅशटॅग्स

Saakshi Medtech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x