23 November 2024 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Mahanagar Gas Share Price | मोदी सरकारच्या सत्ताकाळातील गॅस सिलेंडर पेक्षा स्वस्त आहे महानगर गॅसचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस?

Mahanagar Gas Share Price

Mahanagar Gas Share Price | महानगर गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महानगर गॅस कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे, ब्रोकरेज हाऊस जेफरीजने महानगर गॅस स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

जेफरीजने महानगर गॅस स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महानगर गॅस कंपनीचे शेअर 8.16 टक्के वाढीसह 1113 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी महानगर गॅस स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 1,131.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महानगर गॅस स्टॉक टार्गेट किंमत
मागील काही दिवसापासून महानगर गॅस स्टॉक जबरदस्त तेजीत धावत आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. जेफरीज फर्मच्या तज्ञांनी महानगर गॅस स्टॉकवर 1320 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1034.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची कामगिरी
महानगर गॅस कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी महानगर गॅस कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 30 टक्क्यांनी वाढले आहेत. महानगर गॅस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,957 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mahanagar Gas Share Price today on 04 October 2023.

हॅशटॅग्स

Mahanagar Gas Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x