18 November 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Omaxe Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ओमेक्स शेअरने 1 महिन्यात 61 टक्के परतावा दिला, पैसे गुंतवून पैसा वाढवा

Omaxe Share Price

Omaxe Share Price | शेअर बाजारात बऱ्याच वेळा असे काही शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत पडतात, ज्यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत.

आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्या स्टॉकचे नाव आहे, ओमेक्स लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अवघा एका महिन्यात 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.14 टक्के वाढीसह 74.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील काही दिवसापासून ओमेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात ओमेक्स लिमिटेड स्टॉक 63.38 टक्के वाढला आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 45.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 73.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील सहा महिन्यांत ओमेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी 50.75 रुपये किमतीवर क्लोज झालेले शेअर्स आता 45.02 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचले आहेत.

मागील एका वर्षात ओमेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 21.65 टक्के घसरण झाली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी ओमेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 93.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच वर्षांत ओमेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 60 टक्के पेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली आहे.

5 ऑक्टोबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 215.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 65 टक्के कमजोर झाला आहे. ओमेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 106 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 42.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Omaxe Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Omaxe Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x