19 April 2025 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Lok Sabha Election | NDA बुडतं जहाज? AIDMK नंतर पवन कल्याण यांचा जनसेना पार्टी एनडीएतून बाहेर, देशात इंडिया आघाडीची हवा

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election | अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण यांनी गुरुवारी भाजपप्रणित एनडीएमधून बाहेर पडून टीडीपीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, आंध्र प्रदेशला विकासासाठी जनसेना आणि टीडीपीची गरज आहे. काही दिवसांपूर्वी AIDMK हा मोठा पक्ष NDA मधून बाहेर पडला आहे.

तेलुगू देसम हा मजबूत पक्ष असून आंध्र प्रदेशला सुशासन आणि विकासासाठी तेलुगू देसम पक्षाची गरज आहे. आज टीडीपी संघर्ष करत आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अशा परिस्थितीत टीडीपीला जनसैनिकांच्या तरुणांची गरज आहे. टीडीपी आणि जनसेना एकत्र आल्यास राज्यातील वायएसआरसीपीचे सरकार कोसळेल.

पवन कल्याण टीडीपीला पाठिंबा देणार
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण आंध्र प्रदेशच्या वायएसआर जगनमोहन रेड्डी सरकारवर नाराज आहेत. जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण १४ सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात गेले होते. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते.

या बैठकीत पवन कल्याण यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते. “संपूर्ण बैठक खूप छान पार पडली. यावेळी आत्मनिर्भर भारतावर चर्चा करण्यात आली. माझ्या पक्षाच्या वतीने मी पंतप्रधानांना वचन दिले आहे की, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकारविरोधात लढण्यासाठी एनडीए आणि टीडीपी या आपल्या पक्षाला एकत्र उभे राहण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आता त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने 5.6 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकली होती, तर टीडीपीला 39.7 टक्के मतांसह 23 जागांवर विजय मिळवता आला होता. वायएसआरसीपीने ५०.६ मतांसह १५१ जागा जिंकल्या होत्या.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Lok Sabha Election 2024 Janasena party Pawan Kalyan left NDA 05 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या