23 November 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Brand Rahul Gandhi | प्रसिद्ध कंपनीचा सर्व्ह आला, तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, BRS ची सत्ता जाणार, तर भाजपचा सुपडा साफ होणार

Brand Rahul Gandhi

Brand Rahul Gandhi | तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, तेलंगणा निवडणुकीसाठी निवडणूकपूर्व सर्वेक्षणात आश्चर्यकारक अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोक-पोलने यापूर्वी कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशाचे सव्हे प्रसिद्ध केले होते आणि ते अचूक ठरले होते. त्यामुळे या सर्व्हेने भाजप आणि BRS पक्षाचं टेन्शन वाढलं आहे.

तेलंगणात भाजप सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे, तर बीआरएसने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणतीही कसर सोडत नाही.

तेलंगणा निवडणूकपूर्व सर्वेक्षण
तेलंगणात सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले असले तरी लोकसभा पोलने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पक्षाला केवळ २ ते ३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सर्व्हेत काँग्रेस 61 ते 67 जागा
तेलंगणात राष्ट्रीय काँग्रेस 61 ते 67 जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसला ४५ ते ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. एमआयएम ६ ते ८ जागांपुरतीच मर्यादित राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मागील तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील जागावाटप
मागील तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टीआरएस, ज्याला आता बीआरएस म्हणून ओळखले जाते, 119 पैकी 88 जागांवर विजय मिळवत सरकार स्थापन केले होते.

याउलट काँग्रेसची जागा २१ वरून १९ वर आली होती, तर एमआयएमला सात जागांवर विजय मिळवता आला होता. भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करूनही त्यांना एकच जागा मिळवता आली आणि राजा सिंग यांनी गोशामहल विधानसभा मतदारसंघाची जागा जिंकली. भाजपच्या जागांची टक्केवारी पाचवरून एकवर आली. केसीआर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम करणारे दक्षिण भारतातील पहिले नेते बनू शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

News Title : Brand Rahul Gandhi Lok Poll Telangana pre-poll survey 07 October 2023.

हॅशटॅग्स

#Brand Rahul Gandhi(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x