21 November 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

5 States Election Dates | 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

5 States Election Dates

5 States Election Dates | केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजे सोमवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊ शकतो. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान संपत आहे.

मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आणि तेलंगणात भारत राष्ट्र समिती (बीआरएस (पूर्वीची तेलंगण राष्ट्र समिती) यांची सत्ता आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांतील निवडणुकांकडे सेमीफायनल म्हणूनही पाहिले जात आहे.

एकीकडे एमपीमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होऊ शकते. मात्र, विरोधी आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षानेही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तर राजस्थानमध्ये 200 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यात सत्ताबदलाची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे.

चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारला काँग्रेसकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे आहे भाजप स्पर्धेतही नाही असं चित्र आहे. राज्यात एकूण ११९ जागा आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची धडपड करत असली तरी स्थानिक काँग्रेस नेत्यांची फळी मजबूत असल्याने भाजप हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय.

2018 प्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांची शक्यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

News Title : 5 States Election Dates ECI Press Conference 09 October 2023.

हॅशटॅग्स

#5 States Election Dates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x