12 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
x

Lemon Tree Share Price | क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लेमन ट्री हॉटेल्स शेअर्स ठरणार पैशाचं झाड, तज्ज्ञांकडून शेअरची टार्गेट प्राईस जाहीर

Lemon Tree Share Price

Lemon Tree Share Price| तब्बल 12 वर्षांनंतर भारतात क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. हा टुर्नामेंट भरतातच्या अर्थव्यवस्थेसाठी पोषक ठरू शकतो. फेस्टिव्हल सीझन आणि क्रिकेट वर्ल्ड कपमुळे अनेक भारतीय कंपन्यां जसे की, हवाई वाहतूक आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट अशा कंपन्यांची कमाई वाढू शकते. याचा फायदा लेमन ट्री हॉटेल्स सारख्या कंपनीला होणार आहे.

मागील 6 महिन्यांत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी लेमन ट्री हॉटेल्स स्टॉक 2.48 टक्के घसरणीसह 115.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमुळे भारतीय हॉटेल व्यवसायाला अधिक फायदा होणार आहे. लेमन ट्री हॉटेल्स कंपनीला देखील याकाळात चांगल्या कमाईची अपेक्षा आहे. ही कंपनी भारतातील विविध शहरांमध्ये अनेक हॉटेल्स चालवत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील लेमन ट्री हॉटेल्स स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

2023 या वर्षात लेमन ट्री हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी लेमन ट्री हॉटेल्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 51.27 टक्के वाढले आहेत.

लेमन ट्री हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 70.25 रुपये होती. लेमन ट्री हॉटेल्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9411.89 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लेमन ट्री हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 118.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lemon Tree Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Lemon Tree Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x