18 November 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत 110% परतावा देणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशनला मोठी ऑर्डर मिळाली, शेअर्स खरेदी वेगात

RailTel Share Price

RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन या भारतीय रेल्वे कंपनीला मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.22 टक्क्यांच्या वाढीसह 219 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी हा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. हे काम करण्यासाठी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने 36 महिन्यांचा करार केला आहे, मात्र कंपनीला हा प्रकल्प 9 महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 4.68 टक्के घसरणीसह 208.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रेलटेल कंपनीला 68 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने 67.95 कोटी रुपये मूल्याची ही ऑर्डर दिली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत डेटा सेंटरचे डिझाइन, पुरवठा, स्थापना, चाचणी, कमिशनिंग आणि ऑपरेशनल आणि देखरेख संबंधित जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला डिझास्टर रिकव्हरी सेंटरचे देखभाल करण्याचे काम देण्यात आले आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये देखील रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला विविध ऑर्डर्स मिळाल्या होत्या. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीला केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून 28 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कॉर्पकडून 10 वर्षांच्या मुदतीची 700 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली होती.

रेलटेल कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ई-ऑफिस, लीज्ड लाइन, डेटा सेंटर सेवा, सुरक्षा ऑपरेशन सेंटर सेवा, वाय-फाय सेवा, टॉवर को-लोकेशन, नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर 6.50 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 70 टक्के वाढले आहेत. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 63 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 84 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7200 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RailTel Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x