18 November 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, शेअर्स स्वस्तात खरेदी करून फायदा घेणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील जबरदस्त वाढले आहेत. च्या मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 29.80 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.34 टक्के घसरणीसह 26.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सुझलॉन एनर्जी ही कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीची सुरुवात तुलसी तंती यांनी केली होती. 2022 साली त्यांचे निधन झाले आहे तुलसी तंती यांना ‘विंड मॅन ऑफ इंडिया’ या नावाने देखील ओळखले जाते. मागील एका आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 6.60 रुपयेवरून वाढून 29.80 रुपये किमतीवर पोहोचली होती. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 6.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीपासून हा स्टॉक आत्तापर्यंत 341 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 263 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 29.80 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 21.62 टक्के वाढली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के नफा कमावून दिला आहे.

LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 30-32 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये खालच्या पातळीवर 27 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर अप ट्रेण्डमध्ये या कंपनीचे शेअर्स 30-32 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 10 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x