23 November 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

IFL Share Price | पेनी स्टॉक फक्त 14 रुपयाचा! आयएफएल एंटरप्रायझेस शेअर अल्पावधीत खिसा भरतोय, खरेदी करणार?

IFL Share Price

IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 14.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 331 कोटी रुपये आहे. IFL एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9 रुपये होती.

IFL एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस स्टॉक 2.82 टक्के घसरणीसह 14.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनी आपल्या संयुक्त उपक्रमासह पुढील 18 महिन्यांच्या काळात 6 अब्ज रुपये महसूल आणि 70 कोटी रुपये नफा संकलित करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. IIFL एंटरप्रायझेस कंपनीने अलीकडेच चार्टर पेपर कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे. या दोन्ही कंपन्यां करारानंतर कागद निर्मिती, साठवणूक आणि वितरणाच्या कामात सहकार्य करतील.

चार्टर पेपर ही एक ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय पेपर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. या करारातुम आयएफएल कंपनीला मोठा फायदा मिळू शकतो. ऑस्ट्रेलियन कंपनीशी व्यापारी करार केल्यानंतर आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला महसूल आणि नफा वाढीचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स पुढील 18 महिन्यांत 30 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

3 जानेवारी 2019 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस स्टॉक 43 पैशांवर ट्रेड करत होता. आता IFL एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 14 रुपयेवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 3287 टक्के नफा कमावला आहे. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला नुकताच 73 कोटी रुपये मुल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने दिग्गज ऑस्ट्रेलियन पेपर कंपनीसोबत 6 अब्ज रुपये मूल्याचा एक संयुक्त उपक्रम करार केला आहे.

आयआयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने सेबी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला नुकताच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्लायंटने 73 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. IIFL एंटरप्रायझेस कंपनीने व्यापारी विस्तार करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत 6 अब्ज रुपये मूल्याचा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.

IFL एंटरप्रायझेस कंपनीने सिद्धेश ग्लोबल लिमिटेड कंपनीकडून देखील 1.92 अब्ज रुपये मूल्याची एक ऑर्डर प्राप्त केली आहे. आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कागद आणि स्टेशनरी वस्तूंचा व्यापार करते. नुकताच या कंपनीने 1.92 अब्ज रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर पूर्ण केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Share Price today on 11 October 2023.

हॅशटॅग्स

#IFL Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x