4 December 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
x

Shashijit Infra Share Price | फक्त 38 रुपयांचा शेअर! अल्पावधीत दिला 250% परतावा, शशिजित इन्फ्रा कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस पडतोय

Shashijit Infra Share Price

Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्याच्या वाढीसह 38.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 122 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी शशिजित इन्फ्रा स्टॉक 0.89 टक्के वाढीसह 38.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील वर्षी 9 सप्टेंबर 2022 रोजी शशिजित इन्फ्रा स्टॉक 15 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 250 टक्के वाढला आहे. शशिजित इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 16.20 रुपये होती. शशिजित इन्फ्रा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39370 कोटी रुपये आहे.

नुकतीच शशिजीत इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीने सेबीला माहिती दिली आहे को, कंपनीला गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, केमिकल आणि युटिलिटी बिल्डिंग आणि इतर नागरी कामांसाठी वारी एनर्जी लिमिटेड कंपनीने 21 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

यापूर्वी शशिजित इन्फ्रा कंपनीला श्री हरी डेव्हलपर्स कंपनीने देखील व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 12 कोटी रुपये मूल्याचे काम दिले होते. शशिजित इन्फ्रा कंपनीला दमण येथील आयडीसी औद्योगिक वसाहतीसमोर व्यावसायिक इमारत बांधण्याचे काम मिळाले आहे.

शशीजीत इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी दादरा आणि नगर हवेलीसह गुजरात आणि दमण आणि दीवमध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. शशिजित इन्फ्रा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे डिझाइन आणि डेव्हलपमेंट संबंधित दीर्घ व्यापारी अनुभव आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

29 सप्टेंबर 2022 रोजी शशीजीत इन्फ्रा प्रोजेक्ट स्टॉक 15 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 40 रुपये किमती जवळ ट्रेड करत आहेत. 21 ऑक्‍टोबर 2016 रोजी शशीजीत इन्फ्रा प्रोजेक्ट स्टॉक 12.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमती पासून हा स्टॉक 238 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत शशिजित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shashijit Infra Share Price today on 11 October 2023.

हॅशटॅग्स

Shashijit Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x