6 November 2024 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Tata Steel Share Price | पोलादी ताकदीचा शेअर! टाटा स्टील शेअर्स तेजीत येतोय, तज्ज्ञांनी रेटिंग वाढवली, शेअर कितीची टार्गेट प्राईस पार करणार?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 124.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि काही तासात हा स्टॉक 125.44 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे फिच कंपनीने टाटा स्टील स्टॉकची डीफॉल्ट रेटिंग ‘BB +’ वरून ‘BBB-‘ रेटिंग जाहीर केली आहे. तर ABJA इन्व्हेस्टमेंट फर्मने टाटा स्टील स्टॉकची रेटिंग ‘BB +’ वरून ‘BBB-‘ केली आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 125.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फिच रेटिंग्स फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा स्टील कंपनीच्या स्टैंडअलोन क्रेडिट प्रोफाइलमध्ये संशोधन करून तज्ञांनी स्टॉकची रेटिंग ‘बीबी’ वरून वाढवून ‘बीबी +’ केली आहे. भारतील कच्च्या मालाची उपलब्धता टाटा स्टील कंपनीच्या मजबूत स्थितिसाठी कारणीभूत आहे. भारतात टाटा स्टील कंपनीला स्टील बाजारातील अस्थिर किमतीमुळे महत्वपूर्ण स्पर्धक आधार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तज्ञांनी कंपनीचे रेटिंग वाढवले आहेत.

तज्ञांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुढील काळात उच्च क्षमता, मजबूत आउटपुट आणि कंपनीचा सकारात्मक एबिटा यामुळे पुढील तीन वर्षात कंपनीच्या एबिटा लीवरेजमध्ये घट पाहायला मिळू शकते. टाटा स्टील कंपनीने 2030 पर्यंत आपली भारतातील उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. टाटा स्टील कंपनीचा एबिटा लीवरेज आर्थिक वर्ष 2026 पर्यत कमी होऊन 2.5 पट होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे प्रमाण 2.9 पट आणि 2023 मध्ये हे प्रमाण 2.8 पट होऊ शकते.

टाटा स्टील कंपनीच्या पोर्टफोलिओमधील कमजोर बाब म्हणजे, यूके स्थित कंपनीची मालमत्ता कंपनीच्या खर्चाच्या दृष्टीने कमकुवत दुवा आहे. आर्थिक वर्ष 2013 मध्ये टाटा स्टील कंपनीला 130 दशलक्ष ब्रिटिश पौंड EBITDA तोटा सहन करावा लागला होता. टाटा स्टील कंपनी भारतातून 100 टक्के लोहखनिज आणि 22 टक्के कोळसा उत्पादन कलिंगनगर आणि जमशेदपूरमधील खाणीतून करते.

रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की, टाटा स्टील कंपनीच्या एकत्रित विक्रीचे प्रमाण आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2 टक्के वाढू शकते. युरोपमधील कंपनीचे विक्री प्रमाण कमी झाल्यामुळे आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीच्या कमाईत घट झाली आहे. नीलाचल इस्पात निगम कंपनीच्या कामकाजातील वाढीमुळे आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये वाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याचे अधिग्रहण आर्थिक वर्ष 2023 मध्ये करण्यात आले होते, ज्याची उत्पादन क्षमता आता 1 MTPA च्या जवळ पोहोचली आहे. कलिंगनगर खाणीच्या विस्तारामुळे आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये 6 टक्के आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये 7 टक्के वाढीचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 11 October 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x