22 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Rajasthan BJP Crisis | राजस्थान भाजपमध्ये दोन गट पडले, वसुंधरा राजे समर्थक प्रचंड नाराज, गुजरात लॉबीला अद्दल घडवण्याच्या तयारीत

Rajasthan BJP Crisis

Rajasthan BJP Crisis | भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ४१ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी भाजपने ही ७ खासदार रिंगणात उतरवले आहेत, त्यामुळे आधीच अनेक जागांवर लढलेले नेते नाराज झाले आहेत.

सोमवारी नव्या यादीत ३१ नवे चेहरे आहेत. ज्या नेत्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत, त्यातील अनेक नेते माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय आहेत. आपल्या समर्थकांनी तिकीट कापल्याने वसुंधराही प्रचंड नाराज असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. आता गुजरात लॉबीला अद्दल घडविण्याची तयारी वसुंधरा राजे गटाने केल्याचं वृत्त आहे.

बातमी येताच धास्तावलेला भाजप पक्ष आता डॅमेज कंट्रोल मोडमध्ये दिसत असून नाराज नेत्यांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याची कसरत सुरू करण्यात आली आहे. सोमवारी रात्री पक्षाचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी जयपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नेत्यांशी बोलून त्यांची समजूत काढू, असे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. नेत्यांना बंडखोरी करण्यापासून आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशातील बंडखोर नेत्यांमुळे पक्षाचे नुकसान झाले होते.

मोदी सरकारमधील माजी मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना पक्षाने झोटवाडा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रमुख नेते राजपाल शेखावत नाराज झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तिकीट वाटपानंतर शेखावत यांच्या निवासस्थानी समर्थकांनी जमून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

याशिवाय जयपूरमधील भाजप कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. शेखावत यांनी तिकीट कापल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. गेल्या १५ वर्षांपासून आपण या जागेवर मेहनत घेत असून दोनवेळा विजयी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे नगर मतदारसंघातून तिकीट कापल्याने अनिता सिंह देखील संतापल्या आहेत. अनिता म्हणाल्या की, त्या या मतदारसंघातून प्रबळ दावेदार होत्या, परंतु पक्षाने 2018 मध्ये मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवाराला तिकीट दिले. अनिता म्हणाली की, समर्थकांशी चर्चा केल्यानंतर काय करायचे याचा निर्णय घेऊ. नगर मतदारसंघातून पक्षाने जवाहरसिंग बेधम यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी ते मंत्रीही राहिले आहेत.

विद्याधर मतदारसंघाचे आमदार नरपतसिंह राजवी देखील नाराज आहेत. त्यांच्या जवळच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे, परंतु आपण बंडखोरी करू शकतो किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतो.

नाराज नेत्यांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट
तिकीट कपातीमुळे निराश झालेल्या अनेक नेत्यांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारी वसुंधरा राजे यांची भेट घेतली आहे. भाजप नेते राजपाल सिंह शेखावत, अनिता आणि इतर अनेक नेत्यांनी वसुंधरा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्या समर्थकांनी तिकीट कापल्याने खुद्द वसुंधराही असमाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे काहीही न बोलता ‘एक्स’वर अभिनंदन केले आहे.

News Title : Rajasthan BJP Crisis during assembly election 2023 11 October 2023.

हॅशटॅग्स

#Rajasthan BJP Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x