23 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Stocks To Buy | कुबेर पावेल! पुढील काही दिवसांत हा शेअर 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या कामाचा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम स्टॉक शोधून आणला आणला आहे. शेअर बाजारातील ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काही दिवसांत रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात.

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने रेलिगेअर एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 232.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी रेलिगेअर एंटरप्रायझेस स्टॉक 0.022 टक्के घसरणीसह 231.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनी सावधपणे आपली आर्थिक क्षमता अनलॉक करत आहे. ब्रोकरेज फर्मने रेलिगेअर एंटरप्रायझेस स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 471 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीपेक्षा 103 टक्के अधिक आहे.

रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकने 2023 या वर्षातील 10 पैकी 5 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स सर्वाधिक म्हणजेच 35.7 टक्के मजबूत झाले आहेत. तर जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स सर्वाधिक म्हणजेच 9.6 टक्क्यांनी घसरले होते.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीच्या आरोग्य विमा शाखेत आघाडीचे मार्जिन आणि मजबूत ऑपरेटिंग मेट्रिक्स आहेत. रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकने 21 सप्टेंबर 2023 रोजी 280.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 130 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीपासून हा स्टॉक आता 81 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या संचालक मंडळात रश्मी सलुजा यांची नियुक्ती केली. याव्यतिरिक्त, रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीने मार्च 2023 मध्ये आपल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड या उपकंपनीच्या 17 पैकी 16 कर्जदारांसोबत 2,198 कोटी रुपये कर्जाची वन टाईम सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 12 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x