18 November 2024 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्रीपूर्वी भेट! महागाई भत्ता वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार, आली महत्वाची अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 11 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. रविवार 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकार नवरात्रीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देऊ शकते, असे मानले जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात कॅबिनेट मंजुरीवर शिक्कामोर्तब करू शकते.

महागाई भत्त्यात होणार वाढ
काल, बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवून 42 टक्क्यांवरून 45 टक्के केला जाण्याची शक्यता आहे.

महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ होऊन ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासह जुलै ते सप्टेंबरची थकबाकीही दिली जाऊ शकते.

कर्मचाऱ्यांना नवरात्रीची भेट
१५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून २४ ऑक्टोबरला दसरा आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. गेल्या वर्षीही केंद्र सरकारने नवरात्रीपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते, जी कामगार ब्युरोकडून दर महिन्याला जारी केली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे, पण महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

महागाईपासून दिलासा
सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी १२ ऑक्टोबररोजी जाहीर होणार आहे. परंतु ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई घटून ६.८३ टक्क्यांवर आली, जी जुलैमध्ये १५ महिन्यांतील उच्चांकी ७.४४ टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर घसरला असला, तरी तो रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या सहनशीलतेच्या वरच्या पातळीच्या वर आहे. अन्नधान्यमहागाई दर ऑगस्टमध्ये १० टक्क्यांच्या आसपास होता, जो जुलैमध्ये ११.५१ टक्के होता. साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरवाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच त्रास होत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : 7th Pay Commission DA Hike soon 12 October 2023.

हॅशटॅग्स

#7th Pay Commission(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x