5 November 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Goyal Salt Share Price | अबब! चमत्कार प्रभू! गोयल सॉल्ट IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला 242% परतावा, खरेदी करावा?

Goyal Salt Share Price

Goyal Salt Share Price | गोयल सॉल्ट लिमिटेड या कच्चे मीठ उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारी NSE SME इंडेक्सवर 130 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 38 रुपये निश्चित केली होती. आता हा IPO स्टॉक 242 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे.

या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहे. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी गोयल सॉल्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 135.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोयल सॉल्ट या SME कंपनीने आपला IPO 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला प्रचंड प्रतिसाद दिला होता. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO एकूण 294.61 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 377.97 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 382.45 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर QIB चा राखीव कोटा 67.20 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

गोयल सॉल्ट लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 18.63 कोटी रुपये होता. गोयल सॉल्ट कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 18.63 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. या IPO मध्ये कंपनीने एकूण 49.02 लाख फ्रेश शेअर्स इश्यू केले होते. गोयल सॉल्ट लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 36 रुपये ते 38 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.

गोयल सॉल्ट लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच 25 सप्टेंबर 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांनी 5 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. गोयल सॉल्ट कंपनीने IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून Holani Consultants Pvt Ltd कंपनीला नियुक्त केले होते. तर BigShare Services Pvt Ltd कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

राजस्थान स्थित ही कंपनी कच्चे मीठ बनवण्याचे काम करते. हे औद्योगिक मीठ आणि खाद्य मीठ म्हणून वापरले जाते. गोयल सॉल्ट लिमिटेड ही कंपनी साबण आणि डिटर्जंट उद्योग, रासायनिक उद्योग आणि कापड आणि डाईंग उद्योगांना औद्योगिक मीठ पुरवठा करते. हे मीठ काच, प्लास्टिक, रबर, पॉलिस्टर आणि चामड्याच्या उत्पादन उद्योगांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goyal Salt Share Price 12 October 2023.

हॅशटॅग्स

Goyal Salt Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x