6 November 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 209% परतावा दिला, पैसे अनेक पटीत वाढवत आहे हा शेअर

Genus Power Share Price

Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह 275.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के कमावून दिला आहे. जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 ऑक्टोबर रोजी 245 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7110 कोटी रुपये आहे. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 290 रुपये होती. नीचांक किंमत पातळी 76 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रा स्टॉक 1.29 टक्के घसरणीसह 267.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 6 महिन्यांत जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 275 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या कंपनीला स्मार्ट मीटर संबंधित 3115.01 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

या ऑर्डरनुसार, जीनस पॉवर कंपनीला प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम देण्यात आले आहे. यासह कंपनीला प्रीपेड मीटरचा पुरवठा करणे, त्यांचा चालू करणे, आणि त्यांचे देखभाल करणे असे काम देण्यात आले आहे. सध्या जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 14 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

कोरोना संकटाच्या काळात 29 मे 2020 रोजी जीनस पॉवर इन्फ्रा स्टॉक 14 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 2000 टक्के नफा कमावला आहे. जीनस पॉवर इन्फ्रा कंपनी प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा प्रदान करण्याचे काम करते.

या कंपनीला भारतात विविध राज्यांमधून स्मार्ट मीटरिंग संबंधित ऑर्डर मिळत आहेत. ऑगस्ट 2023 मध्येच जीनस पॉवर इन्फ्रा कंपनी 2247 कोटी रुपये मूल्याची स्मार्ट मीटर बसवण्याची ऑर्डर मिळाली होती. ही कंपनी स्मार्ट ग्रीड, गॅस आणि वीज यासंबंधित मीटरिंग सेवा देखील प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Genus Power Share Price NSE 12 October 2023.

हॅशटॅग्स

Genus Power Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x