17 November 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News EPFO Pension Money | पगारदारांनो आता चिंता करण्याची काही गरज नाही, महिन्याला मिळेल 10 हजार पेन्शन - Marathi News HDFC Mutual Fund | फार कमी व्यक्तींना माहित आहे चिल्ड्रन फंड, केवळ 5 हजारांची SIP, तुमच्या मुलांना मिळेल करोडोत परतावा Post Office Scheme | 100 रुपये गुंतवून लाखोंची रक्कम तयार करायची आहे का, मग पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा - Marathi News IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

Jay Bharat Maruti Share Price | 3 रुपयाची जादू! जय भारत मारुती शेअरने तब्बल 7918% परतावा देत गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं

Jay Bharat Maruti Share Price

Jay Bharat Maruti Share Price | जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 271 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 95 टक्क्यांनी वाढवले आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 344 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 128 रुपये होती.

मागील एका वर्षात जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 48 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के वाढीसह 283.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

8 जानेवारी 1999 रोजी जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.38 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या किमतीवरून हा स्टॉक 7918 टक्के मजबूत वाढला आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिट नंतर जय भारत मारुती कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल.

जय भारत मारुती कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 26 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. जय भारत मारुती लिमिटेड ही कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने ऑटो घटक आणि असेंबली उत्पादन करण्याचे काम करते.

जय भारत मारुती ही कंपनी एक्झॉस्ट सिस्टीम, फ्युएल फिलर आणि सस्पेन्शन पार्ट्स बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी पॅसेंजर कारचे पार्टस देखील बनवते. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे.

जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे उत्पादन कारखाने गुडगाव, बावल, मानेसर आणि गुजरात या ठिकाणी स्थित आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 533 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. कंपनीच्या निव्वळ नफ्यात किंचित घसरण झाली आहे. मात्र तज्ञ अजूनही या स्टॉकबाबत सकारात्मक आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jay Bharat Maruti Share Price NSE 12 October 2023.

हॅशटॅग्स

Jay Bharat Maruti Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x