Vascon Engineers Share Price | मालामाल करतोय शेअर! मागील 5 दिवसांत गुंतवणुकदारांना 21% परतावा दिला, शेअरची किंमतही स्वस्त
Vascon Engineers Share Price | व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 75.030 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू होती. मागील 5 दिवसांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 रुपयेवरून 180 टक्के वाढले आहेत. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1630 कोटी रुपये आहे.
व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 23 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी व्हॅस्कॉन इंजिनिअर्स स्टॉक 6.78 टक्के वाढीसह 81.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
22 मे 2020 रोजी कोरोना संकटाच्या काळात व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर 7 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतपर्यंत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1100 टक्क्यांनी वाढवले आहे.
व्हॅस्कॉन इंजिनियर्स कंपनीने सेबीला माहिती दिली की, झारखंड स्टेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला 353 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कोडरमा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम आणि जिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी देण्यात आली आहे.
सोमवारी व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीने ब्रिज अँड रूफ कंपनी इंडिया लिमिटेड कंपनीकडून 262 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर मिळवली होती. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला छत्तीसगड राज्यामधील कांकेर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजन, रचना, बांधकाम, आयटी नेटवर्किंग आणि देखभाल संबंधित कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला छत्तीसगड सरकारच्या छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी देण्यात आला आहे.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स या कंपनीची स्थापना 1986 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः बांधकाम अभियांत्रिकी कंपनी क्षेत्रात व्यवसाय करते. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनी अॅसेट लाइट मॉडेल आणि क्लीन रूम पार्टीशन मॅन्युफॅक्चरिंग संबंधित व्यवसाय देखील करते. या कंपनीने आतापर्यंत 200 पेक्षा अधिक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहे. मंगळवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत होती. सध्या हा कंपनीकडे 1980 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स शिल्लक आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vascon Engineers Share Price NSE 12 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल