18 November 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर खरेदी करावा? काय सांगतात तज्ज्ञ? शेअरचा अल्पकालीन परतावा तपासून घ्या

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 984.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र त्यानंतर या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला, आणि शेअर 0.75 टक्के घसरणीसह 964.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील पेटीएम कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये One97 Communication या आपल्या मूळ कंपनीच्या नावाने झाली होती.

गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 0.71 टक्क्यांच्या घसरणीसह 964.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के घसरणीसह 936.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरची किंमत 48.71 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 81.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन पुढील आठवड्यात आपले सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पेटीएम कंपनी सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल 20 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करू शकते. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत तज्ञांना कंपनीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पेटीएम कंपनीचा स्टॉक सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यावेळी पेटीएम कंपनीच्या शेअरची किंमत 1,800 रुपये होती. मात्र, त्यानंतर स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price NSE 13 October 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x