26 November 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी हे 2 हॉट स्टॉक सेव्ह करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, खरेदी करून फायदा मिळवा

Hot Stocks

Hot Stocks | जागतिक मंदीच्या भीतीमुळे आणि तेलाच्या किमतीत होणाऱ्या संभाव्य भडक्यामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून कोणते शेअर्स खरेदी करावे याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून काही ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून 2 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये Zomato आणि CDSL कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

Zomato :
शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्के वाढली होती. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला होता.

मागील सहा महिन्यांत zomato कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के नफा कमावून दिला होता. तर YTD आधारे हा स्टॉक 85 टक्के मजबूत झाला आहे. तज्ञांच्या मते दीर्घ मुदतीत या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 45 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी Zomato स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 111.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

CDSL :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अल्प कालीन गुंतवणुकीसाठी सीडीएसएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स साडेचार टक्क्यांच्या वाढीसह 1390 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. डीमॅट व्यवसायात सीडीएसएल कंपनीने एकूण 70 टक्क्यांपेक्षा जास्त बाजार काबीज केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी CDSL स्टॉकवर 1250 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1500 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना साडेचार टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदाराना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 1,384.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment on 14 October 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x