5 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Saakshi Medtech Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! अवघ्या 10 दिवसात 200% परतावा दिला, तुम्ही सुद्धा या शेअरबद्दल विचार करा

Saakshi Medtech Share Price

Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात प्रवेश केल्यावर खळबळ उडवून दिली आहे. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचा IPO स्टॉक 92-97 रुपये प्राइस बँडवर वाटप लाँच करण्यात आला होता. तर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते.

साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. अवघ्या 10 दिवसांत साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीच्या शेअर्सने 200 रुपये किंमत पार केली आहे. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी साक्षी मेडटेक अँड पॅनल्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 225.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

13 ऑक्टोबर 2023 रोजी साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स 215.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे हा स्टॉक 97 रुपयेवरून किमतीवरून 225 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 3 ऑक्टोबर 2023 रोजी साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 146 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. ज्या दिवशी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला, त्या दिवशी कंपनीचे शेअर्स 153 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

12 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 204.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 13 ऑक्टोबर 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 215.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 146 रुपये होती.

साक्षी मेडटेक कंपनीचे IPO शेअर्स एनएसई इंडेक्सच्या एसएमई एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO स्टॉक 91 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 75.88 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 200.78 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 37.35 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचा IPO 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 45.16 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Saakshi Medtech Share Price NSE 16 October 2023.

हॅशटॅग्स

Saakshi Medtech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x