23 November 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

MMTC Share Price | एमएमटीसी शेअरने 6 महिन्यात 150% परतावा दिला, आज देखील तुफान तेजीत, फायद्याची ठरेल गुंतवणूक

MMTC Share Price

MMTC Share Price | भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एमएमटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत अजूनही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.38 टक्के वाढीसह 80.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमएमटीसी कंपनीमध्ये भारत सरकारची एकूण हिस्सेदारी 90 टक्के आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएमटीसी स्टॉक ५.६६ टक्के वाढीसह 74.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक तब्बल 8.38 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,196 कोटी रुपये आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील एका महिन्यात एमएमटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समे आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. तज्ञांनी, ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना 70 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील काळात काही दिवसात हा स्टॉक 85 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत सरकारने एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे एकूण 89.90 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर या कंपनीत सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 7.54 टक्के आहे. 2018 साली एमएमटीसी लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MMTC Share Price 16 October 2023.

हॅशटॅग्स

MMTC Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x