27 November 2024 12:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 2 दिवसात 20% वाढला, दुसरी अपडेट आली, स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: IDEA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
x

Rajgor Castor Derivatives IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत फक्त 47 रुपये, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा

Rajgor Castor Derivatives IPO

Rajgor Castor Derivatives IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 17 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर दरम्यान राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनी आपल्या IPO द्वारे 88.95 लाख फ्रेश शेअर्स आणि 6.66 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल इश्यू जारी करणार आहे.

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 47 रुपये ते 50 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,50,000 रुपये जमा करावे लागणार आहे. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 27 ऑक्टोबर 2023 रोजी शेअरचे वाटप करेल.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनीचा IPO स्टॉक 10 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीच्या आसपास सूचीबद्ध होऊ शकतात. सध्याच्या GMP नुसार गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 20 टक्के नफा मिळू शकतो.

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्ह IPO स्टॉक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सूचीबद्ध होऊ शकतो. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज कंपनीने आपल्या IPO द्वारे अँकर गुंतवणूकदारांमार्फत 13.56 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. या कंपनीने 16 ऑक्टोबर 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajgor Castor Derivatives IPO 16 October 2023.

हॅशटॅग्स

Rajgor Castor Derivatives IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x