18 November 2024 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Tiger Logistics Share Price | मालामाल शेअर! टायगर लॉजिस्टिक शेअर फायदा देतोय, 1500 टक्के परतावा देऊन तिजोरी भरली

Tiger Logistics Share Price

Tiger Logistics Share Price | टायगर लॉजिस्टिक या कंपनीच्या शेअरची किंमत एका दिवसात 6.42 टक्के वाढली आहे. टायगर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 473 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टायगर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 480 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 218 रुपये होती.

टायगर लॉजिस्टिक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 503 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्के वाढली आहे.

टायगर लॉजिस्टिक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांनी आयसीआयसीआय बँकेसोबत एकात्मिक बँकिंग आणि एंड टू एंड लॉजिस्टिक व्यवसायासाठी एक भागीदारी करार संपन्न केला आहे. या करारामुळे निर्यातदार आणि आयातदारांना फायदा होऊ शकतो. आयसीआयसीआय बँक आणि टायगर लॉजिस्टिक्स यांच्यामध्ये झालेला हा जागतिक लॉजिस्टिक आणि बँकिंग करार आहे. या करारा अंतर्गत आयातदार आणि निर्यातदारांना त्रास-मुक्त शिपिंग सेवा प्रदान केली जाणार आहे.

आयसीआयसीआय बँक आणि टायगर लॉजिस्टिक्स यांच्यातील करारामुळे आयसीआयसीआय ट्रेड इमर्ज प्लॅटफॉर्म आणि टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या मालकीच्या डिजिटल फ्रंट बुकिंग आणि मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण होणार आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी टायगर लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 351 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अवघ्या 2 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात टायगर लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 मार्च 2020 रोजी टायगर लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 32 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 1500 टक्के वाढले आहेत.

टायगर लॉजिस्टिक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांना भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. टायगर लॉजिस्टिक कंपनी तृतीय पक्ष लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक लॉजिस्टिक्स संबंधित सेवा प्रदान करते. या कंपनीने आता भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीकडून 10 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे.

टायगर लॉजिस्टिक्स कंपनीच्या ग्राहक वर्गात बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स, नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग आणि R&D इन्फ्रा, इंडियन ऑइल, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, IRCON इंटरनॅशनल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी यासारखे दिग्गज कंपनी सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tiger Logistics Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

Tiger Logistics Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x