22 November 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Nirman Agri Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ऍग्री कंपनीच्या शेअरने 6 महिन्यात 356% परतावा दिला, मजबूत नफ्यातील कंपनी, वेळीच खरेदी करा

Nirman Agri Share Price

Nirman Agri Share Price | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचे शेअर्स बुधवारी विक्रीच्या दबावात 238 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्के वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 356 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी निर्माण अॅग्री जेनेटिक्स स्टॉक 0.52 टक्के घसरणीसह 231.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 136 टक्के वाढवले आहेत. भारतीय कृषी व्यवसाय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीने भारतीय कृषी उद्योग वाढीचा फायदा आपल्या व्यवसायात करून घेतला आहे. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

उच्च दर्जाचे हायब्रीड बियाणे, कीटकनाशके, जैव-सेंद्रिय आणि इतर कृषी उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने आपल्या महसुल संकलनात 27.8 टक्के वाढ साध्य केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने 129.47 कोटी रुपये कमाई केली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात 4580 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. तर निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने 16 टक्क्यांच्या वाढीसह 23.32 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने नुकताच माऊली श्री सीड प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि न्यू रेणुका हायब्रीड सीड प्रोसेसिंग प्लांटसोबत एक व्यापारी करार संपन्न केला आहे. त्यामुळे निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या व्यवसाय वाढीचे संकेत पाहून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात.अॅग्री जेनेटिक्स कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना करोडपती बनवू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nirman Agri Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

Nirman Agri Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x