11 December 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

TCS Share Price | भरवशाच्या TCS शेअरवर डिव्हीडंड मिळणार, पण शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञ काय सांगतात?

TCS Share Price

TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 9 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 19 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती.

टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने 2007 पासून शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची परंपरा सुरू केली आहे. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS स्टॉक 1.02 टक्के वाढीसह 3,490.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

TCS कंपनीने तिमाही निकालात दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 11432 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने 10431 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जून 2023 तिमाहीत TCS कंपनीने 11,074 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. टीसीएस कंपनीने 2009 आणि 2018 मध्ये देखील आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीने दोन्ही वेळा गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर दिला होता.

TCS कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्ड तारिखच्या दिवशी कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 9 रुपये लाभांश देणार आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात लाभांश जमा केला जाईल. 2023-24 या आर्थिक वर्षातील कंपनीने दिलेला हा दुसरा अंतरिम लाभांश असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE 20 October 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x