6 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Gold Rate Today | बापरे! सणासुदीच्या दिवसात आज सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी वाढ, दिवाळीपर्यंत किती महाग होणार सोनं?

Gold Rate Today

Gold Rate Today | देशातील सर्वात मोठा सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात सर्वच वस्तूंची भरपूर खरेदी होत असते. त्यात सोन्या-चांदीचाही समावेश आहे. पण यंदा सणासुदीच्या हंगामापूर्वी सोने-चांदीचे दर अनियंत्रित झाले आहेत. गेल्या आठवडय़ात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

सध्या सोन्याचा दर किती महाग
गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,693 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 59121 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. अशा प्रकारे संपूर्ण आठवड्यात सोन्याचा दर सुमारे 1572 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला.

त्याचबरोबर चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 71,991 रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 70879 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे आठवडाभरात चांदीचा भाव प्रति किलो १११२ रुपयांनी वधारून बंद झाला.

सणासुदीच्या काळात सोने खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

सोन्याची शुद्धता :
सोने कॅरेटमध्ये मोजले जाते, २४ कॅरेट शुद्ध सोने असते, पण दागिन्यांमध्ये २२ कॅरेट चा वापर केला जातो.

हॉलमार्किंग :
सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग नक्की तपासा

सोन्याचा भाव :
ज्वेलर्स सांगत असलेला सोन्याचा भाव योग्य आहे की नाही हे तपासून पहा.

मेकिंग चार्जेस :
दागिने घेताना मेकिंग चार्जची माहिती नक्की घ्या.

ज्वेलरकडून बिल नक्की घ्या :
सोने खरेदी केल्यानंतर सोनाराकडून बिल घ्या.

ऑनलाइन पेमेंट करा :
दागिने घेतल्यानंतर सोनाराला ऑनलाइन पेमेंट करा, यामुळे फसवणूक थांबेल.

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 892 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

तर चांदी 4473 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 22 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(310)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x