23 November 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

Pakka Share Price | कमाल केली! या शेअरने 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, पुढे 1 वर्षात किती परतावा? संयम किती परतावा देऊ शकतो?

Pakka Share Price

Pakka Share Price | मागील 3 महिन्यांपासून शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक संबंधित माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीचे नाव आहे, पक्का लिमिटेड.

21 ऑक्टोबर 2023 रोजी पक्का लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले की, पक्का लिमिटेड कंपनी आपली उपकंपनी असलेल्या पक्का इम्पॅक्ट लिमिटेड कंपनीमधील 2.50 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. सध्या पक्का लिमिटेड कंपनीने आपल्या उपकंपनीचे 97.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी पक्का लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के वाढीसह 252.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पक्का लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळाली होती. आज मात्र हा स्टॉक तेजीत वाढत आहे. सोमवारी पक्का लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे.

सोमवारी पक्का लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.94 टक्क्यांच्या घसरणीसह 248.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत पक्का लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 12 टक्के वाढली आहे.

पक्का लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पॅकेजिंग उद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. पक्का लिमिटेड ही कंपनी 1981 साली यश पेपर्स लिमिटेड या नावाने स्थापन झाली होती. ही कंपनी तेव्हापासून कंपोस्टेबल पॅकेजिंग सोल्यूशन्समध्ये जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी बनली आहे. पक्का लिमिटेड ही कंपनी नॉन-कंपोस्टेबल मल्टीलेयर लवचिक पॅकेजिंग, सिंगल युज प्लास्टिक आणि स्टायरोफोम यांना कंपोस्टेबल आणि पुनरुत्पादक पर्याय प्रदान करते.

पक्का लिमिटेड कंपनीचे मुख्य निर्मिती सुविधा केंद्र 8.5 मेगावॅट क्षमतेचे आहे. या केंद्रात कंपनी स्वतः वीज निर्माण करते, आणि ही वीज पूर्णतः 100 टक्के बायोमास ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाते. या केंद्रात वापरला जाणारा संपूर्ण कच्चा माल आणि इंधन हे स्थानिक पातळीवरून मिळवले जाते. आणि ते उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या रसायनांतून 95 टक्के पुनर्प्राप्त करता येते.

या कंपनीने आपले लक्ष नावीन्यपूर्ण योजनेवर आणि R&D वर केंद्रित केले आहे. यासह ही कंपनी फायबर, पल्प, पेपर, बायोपॉलिमर, मोल्डेड उत्पादने, वेस्ट लाईन यासारखी उत्पादने निर्माण करण्याचे काम करते. पक्का लिमिटेड कंपनीच्या कर्मचारी कुटुंबात 450 पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील उत्पादन केंद्रात काम करणारे बहुतेक कर्मचारी अयोध्या शहरांतील आणि आसपासच्या खेड्यांमध्ये राहणारे लोक आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pakka Share Price NSE 25 October 2023.

हॅशटॅग्स

Pakka Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x