6 November 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News Job Opportunity | 10'वी पास असाल तरीसुद्धा मिळेल सरकारी नोकरी; सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाणून घ्या Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News EPFO Passbook | पगारदारांनो, हायर-पेन्शनसाठी अपडेट लक्षात घ्या, अन्यथा हायर-पेन्शन मिळणार नाही, फॉलो करा स्टेप्स
x

Adani Group Share Price | अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण पाहून गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय?

Adani Group Share Price

Adani Group Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचा भाग असलेले सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स 2 ते 7 टक्क्यांनी घसरले होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये झालेली ही सलग नवव्या दिवशीची घसरण आहे.

यापूर्वी मार्च 2020 मध्ये देखील अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सलग नऊ दिवस स्टॉक घसरला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्टस कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 2,253.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.21 टक्क्यांच्या घसरणीसह 296.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अदानी विल्मर स्टॉक 2.81 टक्क्यांच्या घसरणीसह 311 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह मागील सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक हा अदानी समूहातील सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 1.54 टक्क्यांच्या घसरणीसह 757.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 4.36 टक्क्यांच्या घसरणीसह 520.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स मागील दोन वर्षांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. एनडीटीव्ही अदानी एनर्जी सोल्युशन, एसीसी आणि अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरमध्ये देखील 4 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती.

मागील काही काळापासून अदानी समुहाचे विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अदानी पॉवर लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, एसीसी, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि अदानी विल्मार लिमिटेड कंपनीचे लेखा परीक्षक म्हणून एस आर बाटलीबोई हे कर्तव्य बजावत आहेत 2017 पर्यंत त्यांनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या अकाउंट पुस्तकांवर स्वाक्षरी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार NFRA ने भारतातील EY च्या सदस्य कंपन्यांपैकी एक असलेल्या एस आर बाटलीबोई यांच्या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Share Price NSE 27 October 2023.

हॅशटॅग्स

Adani Group Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x