22 November 2024 10:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | तज्ज्ञांचा गुंतवणुकीचा सल्ला! शांती गीअर्स शेअरसाठी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील 6 दिवसापासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी खरेदीसाठी एक.मजबूत स्टॉक निवडला आहे.

गुंतवणूकदार या स्टॉकवर अल्पकालीन ते दीर्घकालीन दृष्टीकोनातून पैसे लावू शकता. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्यांचे नाव आहे, शांती गीअर्स लिमिटेड. तज्ज्ञांनी शांती गीअर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शांती गीअर्स लिमिटेड ही कंपनी ऑटो ऍक्सेसरी बनवण्याचे काम करते. ही कंपनी अभियांत्रिकी, स्टील, सिमेंट, रेल्वे यांसारख्या क्षेत्रात देखील व्यवसाय करत आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकची स्थिती मजबूत असून कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नाही. शांती गीअर्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वाहनाचे कस्टमाइज्ड गिअरबॉक्स बनवण्यात अग्रणी मानली जाते.

शांती गीअर्स लिमिटेड कंपनीचा इक्विटी परतावा प्रमाण 24 टक्के आहे. याशिवाय कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 1.25 टक्के आहे. मागील 3 वर्षात कंपनीच्या निव्वळ नफ्यात 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर विक्रीत एकूण 22-23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शांती गीअर्स लिमिटेड कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 21 टक्के नोंदवले गेले आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीने 17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आणि सप्टेंबर 2023 मध्ये शांती गीअर्स लिमिटेड कंपनीने 21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शांती गीअर्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 71 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय परकीय आणि देशी गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 4.5 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

शांती गीअर्स लिमिटेड :
सध्याची किंमत : 465 रुपये
शेअरची टार्गेट प्राईस : 490/510 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy for investment on 27 October 2023

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x