22 April 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीच्या दिशेने, लागोपाठ कॉन्ट्रॅक्ट मिळाले, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला ज्युनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 3 मेगावॅट विंड टर्बाइनची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला 3.15 मेगावॅट क्षमतेचे 16 विंड टर्बाइनचा पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. Suzlon Energy Share Price

यासह सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत बांधकाम, कमिशनिंगसह ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा देखील प्रदान करणार आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.03 टक्के वाढीसह 32.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनीला गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीकडून गुजरात राज्यातील द्वारका जिल्ह्यात स्थित 50.4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची ऑर्डर मिळाली होती. हा प्रकल्प 2025 मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

सुझलॉन समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी यांनी दिलेल्या माहिती नुसार, “या प्रकल्पातून मिळणारी वीज गुजरात राज्यातील लोकांना पुरवली जाणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात राज्यासाठी योगदान देण्यात आनंद होत आहे. आणि सुझलॉन एनर्जी कंपनी भारताची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे”.

सप्टेंबर 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीला ब्राइटनाइट कंपनीकडून 29.4 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर देण्यात आली होती. आणि ऑगस्ट 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीला इंटिग्रम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 31.5 मेगावॅट क्षमतेची नवीन ऑर्डर दिली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 32.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑक्टोबर 2023 या कंपनीचे शेअर्स 34.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 28 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या