22 November 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Piccadily Agro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1900% परतावा देणाऱ्या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, मालामाल होऊन जाल

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड या हरियाणातील मद्य निर्मिती करणाशा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीला जगातील सर्वोत्तम व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. मध्यंतरी सलग अप्पर सर्किट हीट करणारे पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात होते. आता पुन्हा या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या व्हिस्की ब्रँड इंद्री दिवाळी 2023 एडिशनला जगातील सर्वोत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 241.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील काही दिवसापासून पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र नंतर स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू झाल्याने शेअरची किंमत 328 रुपयेवरून घसरून 218.35 रुपये किमतीवर आली होती. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला होता. मागील सहा महिन्यांत पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 409 टक्के वाढली आहे.

2023 या वर्षी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 447 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 405 टक्के वाढली आहे. तर मागील 5 वर्षात पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1900 टक्के नफा कमावून दिला आहे. पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 328 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 38.70 रुपये होती.

29 सप्टेंबर 2023 पासून पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत.

* 27 ऑक्टोबर 2023 या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटसह 218.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 26 ऑक्टोबर 2023 या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटसह 229.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटसह 241.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटसह 267.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 16 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 297.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 283.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 12 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 269.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
* 11 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 245.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Piccadily Agro Share Price NSE 28 October 2023.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x