22 November 2024 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

KEI Share Price | श्रीमंत झाले गुंतवणूकदार! एक लाख रुपयांचे झाले तब्बल दोन कोटी रुपये, शेअर्सची खरेदी अजून वाढली

KEI Share Price

KEI Share Price | शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना संयमाचे फळ नक्की मिळते. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून दिला आहे.

केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी केईआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता केईआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2,000 रुपयेच्या पार गेले आहेत. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी केईआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.010 टक्के घसरणीसह 2,494 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ऑक्टोबर 2013 मध्ये केईआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअरमध्ये 28389 टक्के वाढ होऊन शेअर 2450 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दोन कोटीपेक्षा जास्त झाले असते.

मागील एका महिन्यात केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. मागील एका महिन्यात केईआय इंडस्ट्रीज स्टॉक 4.55 टक्के स्वस्त झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31.59 टक्के परतावा कमावून दिला आहे.

केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 586.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून केईआय इंडस्ट्रीज स्टॉक 68.70 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52.20 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत केईआय इंडस्ट्रीज स्टॉक 586.55 टक्के वाढला आहे. केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,815.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1,352.95 रुपये होती.

केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः केबल्स आणि वायर्स बनवण्याचा व्यवसाय करते. फेब्रुवारी 2023 मध्ये केईआय इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप केला होता. या कंपनीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांनी एकूण 62.92 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEI Share Price NSE 28 October 2023.

हॅशटॅग्स

KEI Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x