6 November 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News Job Opportunity | 10'वी पास असाल तरीसुद्धा मिळेल सरकारी नोकरी; सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाणून घ्या Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News
x

Goyal Salt Share Price | कुबेर पावतोय! फक्त 36 रुपयाच्या शेअरने अवघ्या 15 दिवसात 343 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?

Goyal Salt Share Price

Goyal Salt Share Price | एक महिन्यापूर्वी गोयल सॉल्ट स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. गोयल सॉल्ट कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 36-38 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर धारकांना 38 रुपये किमतीवर शेअर्स वाटप करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंग झाल्यावर 15 दिवसाच्या आत गोयल सॉल्ट स्टॉक 165 रुपयेच्या पार गेला आहे.

गोयल सॉल्ट कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना 343 टक्के परतावा कमावून दिला आहे. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO 26 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 172 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

38 रुपयेवरून स्टॉक 172 रुपयेवर पोहचला :
गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स आयपीओमध्ये 38 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. तर या कंपनीचे शेअर्स 11 ऑक्टोबर 2023 रोजी 130 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स 27 ऑक्टोबर 2023 रोजी 168.50 रुपये किमतीवर पोहोचले होते.

गोयल सॉल्ट कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंग झाल्यापासुन आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 343 टक्के परतावा कमावून दिला आहे. गोयल सॉल्ट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 189.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.50 रुपये होती.

IPO तपशील : गोयल सॉल्ट कंपनीचा IPO एकूण 294.61 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 377.97 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 382.45 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 67.20 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला होता.

या कंपनीच्या IPO चा आकार 18.63 कोटी रुपये होता. गोयल सॉल्ट ही कंपनी मुख्यतः कच्च्या मिठाचे शुद्धीकरण करण्याचा व्यवसाय करते. किरकोळ गुंतवणूकदार गोयल सॉल्ट कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट खरेदी करू शकत होते. या एका लॉटमध्ये कंपनीने 3000 शेअर्स ठेवले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goyal Salt Share Price NSE 30 October 2023.

हॅशटॅग्स

Goyal Salt Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x