23 November 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

DP Wires Share Price | मालामाल होणार का? गुंतवणूकदारांना 3 वर्षात 900 टक्के परतावा दिला, बोनस शेअर्स वाटप करणार

DP Wires Share Price

DP Wires Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या भीषण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या या युद्ध परिस्थितीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे भारतीय शेअर बाजारात देखील विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. मात्र अशा मंदीच्या काळात देखील काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. असाच एक स्टॉक आहे, डीपी वायर्स लिमिटेड कंपनीचा. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी डीपी वायर्स स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 659.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच डीपी वायर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्के परतावा कमावून दिला आहे. डीपी वायर्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः स्टील वायर, प्लास्टिक पाईप्स आणि प्लास्टिक फिल्म्स बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी तेल आणि वायू, ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये देखील काम करते. नुकताच या कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 7 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे.

डीपी वायर्स कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 8 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. डीपी वायर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 865 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत डीपी वायर्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्के नफा कमावून दिला आहे.

डीपी वायर्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 74.75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. एप्रिल-जून 2023 तिमाहीमध्ये डीपी वायर्स कंपनीने 45.97 टक्क्यांच्या वाढीसह 11.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर याच तिमाहीत कंपनीने 32.59 टक्क्यांच्या वाढीसह 265 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DP Wires Share Price today on 30 October 2023

हॅशटॅग्स

DP Wires Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x