18 November 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
x

Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी केल्यास 1 शेअरवर 6 शेअर्स मोफत मिळतील

Bonus Shares

Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

शेअरधारकांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत मिळणार आहे. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 252.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

28 ऑक्टोबर 2023 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

मागील 3 वर्षात पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 285 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 120 कोटी रुपये आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 240.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड ही कंपनी 1986 साली स्थापन झाली होती. ही कंपनी भारतातील आघाडीच्या मनोरंजन कंटेंट निर्मिती करण्यास कंपनीपैकी एक मानली जाते. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनी भारतात आणि परदेशात चित्रपट निर्मिती, वितरण आणि सह-निर्मितीचा व्यवसाय करते. पूजा एंटरटेनमेंट कंपनी उच्च दर्जाचे कंटेंट बनवण्याचे आणि बॉलिवूड तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे वितरण भारतात करण्याचा उद्योग करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares today on 30 October 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x