23 November 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | नोट करा! अवघ्या एका महिन्यात 45 टक्के परतावा दिला या शेअरने, मल्टिबॅगर परतावा देण्याचा इतिहास

Multibagger Stocks

Multibagger Stocks | इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड म्हणजेच आयआयटीएल कंपनीचे शेअर्स 12.5 टक्क्यांच्या वाढीसह 144 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2000 साली इंडिया इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीला भारतीय रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपनीचा दर्जा बहाल केला होता. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी आयआयटीएल स्टॉक 14.59 टक्के वाढीसह 153.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 322 कोटी रुपये आहे. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 168 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 73 रुपये होती. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 127 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 151.60 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के, मागील 6 महिन्यांत गुंतवणुकदारांना 88 टक्के, आणि मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के नफा कमावून दिला आहे. 26 मार्च 2021 रोजी आयआयटीएल स्टॉक 51 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. या नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 200 टक्के वाढला आहे.

आयआयटीएल या कंपनीची स्थापना 1933 साली झाली होती. ही कंपनी एका गुंतवणूक ट्रस्ट कंपनीप्रमाणे काम करते. आयआयटीएल कंपनी मुख्यतः शेअर्स, स्टॉक्स, डिबेंचर आणि बाँड्स इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्याचे काम करते. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट कंपनी खाजगी इक्विटी आणि मार्जिन फंडिंग संबंधित कार्य देखील करते. मागील काही वर्षांपासून या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने लाभांश वाटप केला आहे. यासह कंपनीने गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स देखील वाटप केले आहे.

आयआयटीएल कंपनीच्या सहयोगी कंपन्यामध्ये ITL प्रोजेक्ट्स लिमिटेड, ITL मॅनेजमेंट अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, IIT इन्व्हेस्ट ट्रस्ट लिमिटेड, ITL कॉर्पोरेट इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, IITL मार्केटिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, IITL ने वर्ल्ड रिसॉर्ट लिमिटेड, या कंपन्या सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks for investment on 31 October 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x