18 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअर्सची टार्गेट प्राईस तज्ज्ञांनी वाढवली, अल्पावधीत होईल मजबूत कमाई, प्रसिद्ध मल्टिबॅगर शेअर

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 5499 रुपयेवरून वाढून 5630 रुपये किमतीवर जाऊ शकते. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 13 टक्के वाढू शकतात. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19000 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 5,126.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअसंनी 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 1809 रुपयेवरून वाढून 5020 रुपयेवर गेली होती. म्हणजेच 2023 या वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 177.5 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अपार इंडस्ट्रीज ही कंपनी जगातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरचे उत्पादन करणारी कंपनी आहे. यासह अपार इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रान्सफॉर्मर उत्पादन करणारी कंपनी मानली जाते.

अपार इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वात मोठी निर्यातदार आणि विशेष केबल्स बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. तसेच अपार इंडस्ट्रीज कंपनी इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

अपार इंडस्ट्रीज ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, कंडक्टर, पेट्रोलियम स्पेशॅलिटी ऑइल अँड पॉवर आणि टेलिकॉम केबल्सचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. मागील आठवड्यात अपार इंडस्ट्रीज कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

सप्टेंबर 2023 तिमाहीत अपार इंडस्ट्रीज कंपनीने 69 टक्के वाढीसह 174 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीत अपार इंडस्ट्रीज कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीने 21.36 टक्के वाढीसह 3926 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price NSE 01 November 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x