Suzlon Vs Inox Wind Share | सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड एनर्जी शेअर्स तेजीत, कोणता शेअर मोठा परतावा देईल?
Suzlon Vs Inox Wind Share | मागील काही दिवसांपासून आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये कॉर्पोरेट कृती म्हणजेच कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे तेजी पाहायला मिळत होती.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2993.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 2,873.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक वाढीचे कारण :
वास्तविक आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीने आपली उपकंपनी असलेल्या आयनॉक्स विंड लिमिटेडमधील 800 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या व्यवहारानंतर आयनॉक्स विंड एनर्जीचा IWL कंपनीमधील वाटा 50.20 टक्केवरून कमी होऊन 38.43 टक्क्यांवर आला आहे. स्टॉक विक्रीतून मिळालेली रक्कम आयनॉक्स विंड कंपनीचे बाह्य कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. आणि काही रक्कम कंपनीचा ताळेबंद मजबूत करण्यासाठी खर्च केली जाणार आहे.
स्टॉक विक्रीचे तपशील :
ब्लॉक डील डेटानुसार आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीने आपली उपकंपनी आयनॉक्स विंडचे 3.83 कोटी इक्विटी शेअर्स म्हणजेच जवळपास 11.77 टक्के भाग भांडवल 210.23 रुपये किमतीवर विकले आहेत. यांचे एकूण मुल्य 806.48 कोटी रुपये आहे. दरम्यान स्मॉल कॅप वर्ल्ड फंड इंकने आयनॉक्स विंड कंपनीमधील 74.51 लाख इक्विटी शेअर्स सरासरी 211.7 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत.
त्याचप्रमाणे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने देखील 24.06 लाख शेअर्स 209 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंड I ने आयनॉक्स विंड कंपनीचे 47.84 लाख शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले आहेत. तर बीएनपी परिबास आर्बिट्रेज कंपनीने आयनॉक्स विंड कंपनीचे 23.92 लाख शेअर्स 209 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Vs Inox Wind Share NSE 2 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार