20 September 2024 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kangana Ranaut | पाकिस्तानमध्ये देखील बॉलीवूड स्टार 'कंगना रनौतची' हवा, महिलेने काढलाय हुबेहूब कंगनासारखा आवाज HDFC Mutual Fund | पगारदारांनो, महिना 800 रुपये SIP बचत करा, मिळेल 1,12,53,528 रुपये मॅच्युरिटी रक्कम - Marathi News L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News
x

Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा

Cello World IPO

Cello World IPO | सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या IPO ला पहिल्या 2 दिवसात गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 रुपये ते 648 रुपये दरम्यान निश्चित केली होती. पहिल्या दोन दिवसात सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO दुप्पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचा IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 1.55 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.11 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.05 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 4.58 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 2023 रोजी 0.41 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक 131 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 779 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. तज्ञांच्या मते पहिल्याच दिवशी स्टॉक लिस्टिंगमधून गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा मिळू शकतो. या कंपनीचे शेअर्स 6 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 23 शेअर्स ठेवले आहेत.

गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,904 रुपये जमा करावे लागतील. गुंतवणूकदार सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. या कंपनीने आपल्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी प्रति शेअर 61 रुपये सूट दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cello World IPO today on 02 November 2023.

हॅशटॅग्स

Cello World IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x