18 November 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024
x

Bliss GVS Share Price | पैशाचा पाऊस पडतोय! अवघ्या 2 दिवसात या शेअरने 23% परतावा दिला, किंमत 100 रुपयांहून कमी

Bliss GVS Share Price

Bliss GVS Share Price | ब्लिस जीव्हीएस फार्मा या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 100.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीचे शेअर्स 84.09 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत.

ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 103.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 68.60 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीचे शेअर 3.11 टक्के वाढीसह 99.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीने पालघर वादूर युनिटची क्षमता वाढवण्यासाठी 30 कोटी रुपये गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या क्षमतेत वाढ झाल्यास या प्लांटची एकूण क्षमता 200 दशलक्ष युनिट्स होईल. आर्थिक वर्ष 2025-26 च्या अखेरीस कंपनीच्या क्षमतेत वाढ होईल. ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी कर्ज आणि कंपनीची रोख खर्च करणार आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीत ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीने 33.89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत गा कंपनीने 25.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2023 च्या तिमाहीत कंपनीने 7.49 कोटी रुपये नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीने 181.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीने 153.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2 जानेवारी 2023 रोजी ब्लिस जीव्हीएस फार्मा कंपनीचे शेअर्स 72.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 100 रुपयेच्या पार गेले आहेत.

ब्लिस जीव्हीएस कंपनीच्या शेअर्स व्यतिरिक्त लिंकन फार्मास्युटिकल्स आणि सोलारा ऍक्टिव्ह फार्मा सायन्सेस या कंपनीच्या शेअरमध्ये देखील बंपर तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लिंकन फार्मा कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 537.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोलारा ऍक्टिव्ह फार्मा सायन्सेस कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 343 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bliss GVS Share Price NSE 03 November 2023.

हॅशटॅग्स

Bliss GVS Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x