22 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा

Adani Ports Share Price

Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीद्वारे संचालित व्यावसायिक बंदरावरील मालवाहतूकीच्या प्रमाणात ऑक्टोबर 2023 या महिन्यात 48 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये 37 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या माल वाहतुकीत 48 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.67 टक्के वाढीसह 795.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की,”APSEZ कंपनीने ऑक्टोबर 2023 या एका महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 3.7 कोटी टन मालाची वाहतूक केली आहे. भारतातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या सर्व बंदरांनी 36 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे”.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीच्या इतिहासात प्रथमच भारतातील बंदर विभागातील मालवाहतुक प्रमाण 35 दशलक्ष टनांच्या पार गेली आहे. APSEZ कंपनीच्या ताब्यात असलेल्या इस्रायलमधील हैफा बंदराने ऑक्टोबर 2023 मध्ये 1.1 दशलक्ष टनांपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली आहे.

मागील सहा महिन्यांच्या सरासरी माल वाहतुकीचापेक्षा हे प्रमाण खूप चांगले आहे. APSEZ कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार उच्च कार्यक्षमतेवर, एकात्मिक व्यवसाय मॉडेलसह एंड-टू-एंड सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports Share Price NSE 04 November 2023.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x