23 November 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन एनर्जी शेअर! दररोज अप्पर सर्किटला धडक, उच्चांक किमतीवर पोहोचला, पुढे टार्गेट प्राईस?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 79 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 34.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2014 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 36.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक जवळपास 80 टक्के घसरला होता. आता पुन्हा या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 35.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीने सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात 79 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने किंचित घसरणीसह 1417 कोटी रुपये ऑपरेटिंग महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,430 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीचा तिमाही EBITDA 224 कोटी रुपये आणि मार्जिन 15.8 टक्के नोंदवला गेला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे व्हाईस चेअरमन गिरीश तांती यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने भारताच्या इको फ्रेंडली संक्रमणाला चालना देण्यासाठी ऊर्जा निर्मिती क्षेत्राला बळकटी देणारी धोरणे तयार केली आहेत. सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये S120 आणि S144 टर्बाइनची 1,613 MW क्षमतेची ऑर्डर प्रलंबित आहे.

सप्टेंबर 2023 तिमाही निकालांनंतर, ब्रोकरेज फर्म JM Financial ने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर 37 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनी आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये अनुक्रमे 38 टक्के आणि 43 टक्के महसूल आणि EBITDA CAGR साध्य करू शकते.

कंपनीच्या ऑर्डर बुकची मजबूत स्थिती, सुधारित उत्पादन पोर्टफोलिओ यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचा सेवा व्यवसाय उत्तम कामगिरी करत असून फोर्जिंग आणि फाउंड्री व्यवसाय भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 599 कोटी रुपये कॅश इन हॅण्ड आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x