23 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची कामगिरी सुसाट, अवघ्या 1 आठवड्यात दिला 35% परतावा, पुढे काय?

JP Associates Share Price

JP Associates Share Price | नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक राहिली आहे. आज देखील स्टॉक मार्केट इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सेन्सेक्स 64363 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 19230 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात 57 स्मॉल कॅप शेअर्स असे होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई लावून दिली आहे.

जयप्रकाश असोसिएट्स या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा कमवून दिला आहे. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे. त्यानंतर SEPC लिमिटेड कंपनीच्या शेअरने देखील अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 35.1 टक्के परतावा कमवून दिला आहे.

यानंतर ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना 29.6 टक्के आणि अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीने 25 टक्के नफा कमवून दिला आहे. जिंदाल सॉ, सुवेन लाइफ सायन्सेस आणि जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 ते 25 टक्क्यांपर्यंत नफा कमवून दिला आहे.

आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 6.56 टक्के वाढीसह 19.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. भारतीय शेअर बाजारात असे काही मिडकॅप शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. मिडकॅप स्टॉकमध्ये व्होडाफोन आयडिया, ओबेरॉय रियल्टी, मायक्रोटेक डेव्हलपर्स या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे.

चालू आठवड्यात, अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करतील. विशेषतः PSU, बँक, वाहन आणि धातू क्षेत्रातील कंपन्या आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करतील. भारतीय शेअर बाजारातील तज्ञांना विश्वास आहे की भारतीय कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल मजबूत, चांगले असतील. जागतिक घडामोडी आणि स्थिर आर्थिक डेटा यामुळे भारतीय बाजारात तेजी टिकुन राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x